शिक्षण प्रसारक मंडळीची नूमवि मुलींची प्रशाला येथे 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त 'हिंदी दिन का मेला' याचे आयोजन करण्यात आले.
शिक्षण प्रसारक मंडळी 15-Sep-2022
Total Views |
शिक्षण प्रसारक मंडळीची नूमवि मुलींची प्रशाला येथे 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त 'हिंदी दिन का मेला' याचे आयोजन करण्यात आले. तसेच आंतरवर्गीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ग्रंथालयात हिंदी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. रांगोळी प्रदर्शनात विद्यार्थिनींनी हिंदी महान लेखक आणि कवयित्री प्रेमचंद, महादेवी वर्मा, कबीर, मीराबाई इ. च्या रांगोळ्या काढल्या. व्यावसायिकांची वेषभूषा करून विद्यार्थिनींनी माहिती दिली. हिंदी भाषिक प्रदेशांची वेषभूषा करून 'विविधता मे एकता' हा संदेश विद्यार्थिनींनी दिला. प्रशालेत हिंदी भाषा व्याकरण व शब्दसंपत्ती याचे फलक व पताका लावून प्रशाला सुशोभित करण्यात आली.
यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा कांबळे संगीता, मा पर्यवेक्षिका ननवरे शुभांगी यांचे मार्गदर्शन लाभले. हिंदी प्रमुख पवार वृंदा यांनी नियोजन केले. हिंदी शिक्षिका लंबाते माधुरी, सरदेसाई मधुराणी, सैंदाणे योगिता, शिंगाडे मीनाक्षी, ढोले अर्चना,पानसरे विनया,पंढरपुरे अंजली, तुळशीबागवाले मीनल, शिंदे मृणालिनी, अत्रे जान्हवी घोगले अबोली, टोके आरती सांस्कृतिक समिती साळवे प्रमिला, डॉ शिंदे मंगल या शिक्षिकांनी सहकार्य केले.