शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय
राज्यशास्त्र विभाग
दिनांक २९ जानेवारी २०२३ रविवार रोजी राज्यशास्त्र विभागात श्री. प्रफुल्ल केतकर यांनी राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले. श्री. प्रफुल्ल केतकर हे ‘ऑर्गनायजर' या राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी मासिकाचे संपादक आहेत. प्रफुल्ल केतकर यांना संशोधन, मिडिया, शैक्षणिक क्षेत्रातील 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ते केंद्र शासनाच्या विविध संस्थांमध्ये मार्गदर्शक व सदस्य म्हणूनही काम करत आहेत. त्यांचे संशोधनाचे व अभ्यासाचे विषय हे आंतरराष्ट्रीय संबंध, भारताचे परराष्ट्र धोरण, भारतीय संस्कृती, हिंदुत्व, लोकशाही व राजकारण हे आहेत.
श्री. प्रफुल्ल केतकर यांनी दोन पुस्तके देखील लिहिली असून, अनेक संशोधन लेखही प्रसिद्ध केले आहेत. श्री. प्रफुल्ल केतकर हे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आज विद्यार्थ्यांना भारताचा इतिहास, त्याचे अनोळखी पैलू, भारतीय संस्कृती, ब्रिटीश शासनाचा परिणाम, भारताचे परराष्ट्र धोरण, हिंदुत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले. आजच्या कार्यक्रमाला राज्यशास्त्र विभागाचे ९० विद्यार्थी उपस्थित होते.