दीपं ज्योती परब्रम्ह दीप ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप दीपज्योती नमोस्तुते
दिनांक १३/०९/२०२२ रोजी शि. प्र. मंडळीच्या मराठी माध्यम, प्राथमिक विभाग निगडी या शाळेत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास श्री. संजय भारद्वाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री. संजय भारद्वाज जी हे एक उत्तम हिंदी लेखक, कवी, नाटककार, संपादक, कहानी लेखन करणारे समीक्षक, पटकथाकार, अनुवादक व हिंदी भाषेचे प्रचारक आहेत. मुख्याध्यापक श्री. रवींद्र मुंगसे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
हिंदी भाषा ही आपल्या देशाची राजभाषा आहे तिचा आपण नेहमीच सन्मान केला पाहिजे. जेव्हा आपण भाषेचा सन्मान करू, तेव्हा आपल्या देशाचा स्वाभिमान आणि हिंदी भाषेचा अभिमान वाढेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली खरबुडे यांनी केले तर अमृता भोईटे यांनी हिंदी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. सदर कार्यक्रमाचे संयोजन श्री. दामोदर भंडारी अध्यक्ष शाला समिती, निगडी यांच्या प्रेरणेतून मुख्याध्यापक रवींद्र मुंगसे यांनी केले.