नू. म. वि मराठी शाळेमध्ये गंधर्व कलादालन व आय एस ओ (ISO)प्रमाणपत्र प्रदान सोहळा संपन्न

07 Sep 2022 13:00:43

andharva Kaladalan opening ceremony
 
गुरुवार दिनांक 1/9/2022 ऋषिपंचमी चे औचित्य साधून नू.म.वि.मराठी शाळेमध्ये गंधर्व कलादालन उदघाटन सोहळा आणि शाळेस आय. एस.ओ. प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ माननीय श्री न.म. जोशी, तसेच शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. एस. के. जैन, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि नू.म.वि मराठी शाळेच्या शाला समितीचे सदस्य माननीय श्रीकृष्ण चितळे, नू.म.वि मराठी शाळेच्या शाला समितीचे अध्यक्ष माननीय श्री. पराग ठाकूर, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य किराड, मिहीर प्रभुदेसाई, श्री. भंडारी तसेच संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य, शिक्षण प्रसारक मंडळीचे ऑपरेशन डायरेक्टर श्री. श्रीरंग कुलकर्णी, शिक्षण प्रसारक मंडळीच्या चिटणीस सौ.राधिका इनामदार, शिक्षण प्रसारक मंडळाचे विविध पदाधिकारी मान्यवर नू. म. वि.मराठी शाळेचे माजी शिक्षक तसेच आत्ताचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर पालक उपस्थित होते.


Gandharva kalavarga
 
Dip prajwalan
 
माननीय एस. के.जैन यांच्या हस्ते गंधर्व कलादालनाचे उदघाटन, नटराजाचे पूजन, तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली. याप्रसंगी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. विद्या सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ न.म. जोशी यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
 
 
S K Jain - S R Chitale
 
माननीय श्री पराग ठाकूर मनोगत व्यक्त केले आणि श्री. चितळे यांनी आय.एस.ओ प्रमाणपत्र मिळवल्यानंतर ची जबाबदारी स्पष्ट केली. I. S. O. च्या ऑडिटर माननीय सौ. सेजल मॅडम तसेच श्री.समीर रुपलग यांनी शाळेला आय.एस.ओ.प्रमाणपत्र प्रदान केले.
 
Receiving ISO certificate
 
त्यानंतर गणेश वंदना व तबलावादन हे कार्यक्रम सादर केले गेले. सर्व मान्यवरांनी शाळेच्या या उपक्रमांचे कौतुक केले. यानंतर माननीय श्री.एस. के. जैन साहेब त्यांनी यापुढेही शाळेला शिक्षण प्रसारक मंडळीचे सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही आपल्या मनोगतातून दिली.

NMV marathi school
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लीना घुगरे बाई यांनी केले होते कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. विद्या सोनवणे बाई यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे सर्व शिक्षक आणि सांस्कृतिक प्रमुख सौ.प्राजक्ता पारेकर बाई व ज्योती अजमेरा बाई यांनी केले होते. अतिशय खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
  
Powered By Sangraha 9.0